Ganesh Naik Eknath Shinde Share Stage | गणेश Naik-Eknath Shinde एकाच मंचावर, राजकीय विस्तवाची चर्चा!

Continues below advertisement
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येणार आहेत. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते गडकरी रंगायतन नाट्यगृहात उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला उदय सामंत आणि प्रताप सरनाईकही उपस्थित राहणार आहेत. गणेश नाईक यांनी यापूर्वी अनेकदा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाण्यात जनता दरबार घेऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही नेत्यांमधील राजकीय विस्तवाची चर्चा सातत्याने सुरू आहे. आजच्या कार्यक्रमात आदर्श मराठी जनांचा सत्कारही होणार आहे. मराठी भाषा विभाग उदय सामंत यांच्याकडे आहे. प्रोटोकॉलनुसार गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रम पत्रिकेत आजचा कार्यक्रम समाविष्ट आहे. दोन्ही नेत्यांमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढलेला आहे. त्यामुळे आज संध्याकाळचा कार्यक्रम विशेष असेल आणि त्याकडे लक्ष असेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola