एक्स्प्लोर
Farmers Tax | Sahyadri Farms चा 218 कोटींचा TAX, शेतकऱ्यांचा गैरसमज दूर
राज्यात पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, ते सरकारच्या मदतीची अपेक्षा करत आहेत. याच परिस्थितीत नाशिकमधील शेतकऱ्यांनी सरकारच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा कर भरला आहे. शेतकरी इन्कम टॅक्स भरत नाहीत, हा मध्यमवर्गीयांचा गैरसमज Sahyadri Farms कंपनीने दूर केला आहे. गेल्या वर्षी Sahyadri Farms ने तब्बल 54 कोटी रुपयांचा आयकर भरला. मागील चौदा वर्षांत कंपनीने एकूण 218 कोटी रुपयांचा कर भरला असून, यात 136 कोटी रुपयांचा आयकर समाविष्ट आहे. शासनाकडून या कंपनीला केवळ 55 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. यावर्षी एकूण 85.5 कोटी रुपयांचा कर भरण्यात आला, ज्यात 54 कोटी रुपयांच्या आयकरचा समावेश आहे. Sahyadri Farms ची वर्षभराची उलाढाल 1965 कोटी रुपये होती. "शासनाला आम्ही चार रुपये दिले आणि शासनाकडून एक रुपया घेतला," असे या संदर्भात नमूद करण्यात आले. शेतकरी हे खरे उत्पादक असून, इतर उत्पादकांप्रमाणे त्यांना भरलेला कर ग्राहकांकडून वसूल करण्याची व्यवस्था नसते.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















