Farmer Ricived Two Rupees : पीक विमा योजनेतून मिळाली अडीच रुपयांची मदत, पालघरमधील शेतकऱ्याची थट्टा?

Continues below advertisement
पालघरच्या वाडा तालुक्यातील सिल्लोबकर येथील शेतकरी मधुकर बाबुराव पाटील यांना सरकारच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) मिळालेल्या तुटपुंज्या मदतीमुळे संतापाची भावना निर्माण झाली आहे. 'सरकार आम्हाला जी मदत देतो ही अतिशय तुटपुंज आहे,' अशी संतप्त प्रतिक्रिया मधुकर पाटील यांनी दिली. पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले असताना, त्यांना नुकसानभरपाई म्हणून बँक खात्यात फक्त दोन रुपये तीस पैसे जमा झाले आहेत. एवढ्या कमी रकमेमुळे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची भावना पाटील यांच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे. ११ एकर शेतीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. संपूर्ण भात शेती पाण्याखाली गेली असून, कापणी करणेही अशक्य झाले आहे आणि अशा परिस्थितीत मिळालेली ही मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola