Sachin Ghaywal : खंडणी प्रकरणी सचिन घायवळवर गुन्हा; पिस्तूल डोक्याला लावून घेतला होता ताबा
Continues below advertisement
खंडणी प्रकरणी सचिन घायबडवर कोथरुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सचिन घायबडने एका बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. कोथरुड येथील एका इमारतीमध्ये बेकायदेशीर प्रवेश करत निलेश घायबडने पिस्तूल डोक्याला लावून इमारतीमधील एकूण दहा फ्लॅटवर बेकायदेशीरपणे खंडणीच्या स्वरुपात ताबा घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सचिन घायबडही सहभागी असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement