Jejuri : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत उत्साह, जेजुरी गडावर लाखो भाविकांची गर्दी ABP Majha

Continues below advertisement

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. या निमित्त राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. अवघा आसमंत हा भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला आहे. दोन वर्षानंतर ही यात्रा भरल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. सकाळी 11 ते साडे अकराच्या दरम्यान गडावरून पालखी कऱ्हा स्नानासाठी निघणार असून सायंकाळी 4  वाजता कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने देवाला स्नान घातलं जाईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram