एक्स्प्लोर
EPFO Update: 'PF खात्यातून 100% रक्कम काढता येणार', Mansukh Mandaviya यांच्या बैठकीत मोठा निर्णय
केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत EPFO संदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत 'इपीएफओ सदस्यांना त्यांच्या खात्यातील शंभर टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येईल', असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांमुळे सदस्यांना आजारपण, शिक्षण, लग्न, घर खरेदी किंवा विशेष परिस्थितीत पैसे काढणे सोपे होणार आहे. विशेष परिस्थितीत पैसे काढताना कारण स्पष्ट करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे दावे नाकारण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मात्र, खात्यात किमान २५ टक्के रक्कम शिल्लक ठेवणे बंधनकारक असेल, जेणेकरून सदस्यांना वार्षिक व्याजाचा लाभ मिळत राहील आणि निवृत्तीसाठी निधी जमा होईल. पूर्वीच्या १३ किचकट नियमांना आता तीन सोप्या श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















