एक्स्प्लोर
Election Commission : 'विरोधकांच्या आरोपांची चौकशी होणार', राज्य निवडणूक अधिकाऱ्यांचं पत्र
राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. 'विरोधकांनी केलेल्या आरोपांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे,' असं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीतील (MVA) महत्त्वाच्या नेत्यांची दोन दिवस निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत चर्चा झाली. विरोधकांच्या आरोपांची चौकशी होणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयावर राज्यातील राजकारणाचा पुढील प्रवास ठरणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















