Girish Mahajan On Politcs: खडसेंना पक्षाने काढले की नैतिकतेने राजीनामा दिला, गिरीश महाजन म्हणाले..
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात पुन्हा एकदा राजीनाम्याच्या मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'त्यावेळी पक्षानेच त्यांना काढून देऊ असं सांगितलं होतं, म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता', असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. यावर खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाजन तेव्हा खूप लहान होते, असे म्हणत, पक्षाचे नेते व्ही. सतीश (V. Satish) यांनी सांगितल्यावर आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून अर्ध्या तासात राजीनामा दिला होता, असे खडसे म्हणाले. गिरीश महाजन यांच्यावर अनेक आरोप होऊनही त्यांनी राजीनामा का दिला नाही, असा सवालही खडसेंनी उपस्थित केला आहे, ज्यामुळे या दोन नेत्यांमधील जुना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement