Ekanth Shinde Vidhan Parishad | तो हिंमत आपकी बोलने की ना होती..एकनाथ शिंदेंचं संपूर्ण भाषण
Ekanth Shinde Vidhan Parishad | तो हिंमत आपकी बोलने की ना होती..एकनाथ शिंदेंचं संपूर्ण भाषण
महायुतीचा महाविजय लाडक्या बहिणींमुळे झाला आहे. विरोधकांनी योजनेवर टीका केली. बहिणीची मते विकत घेतली अशी हेटाळणी केली. मात्र लाडक्या बहिणींनी इव्हीएम बटण दाबलं आणि आम्हाला भरभरून मतदान केलं मी आता दादा भुसे यांना भिसे गुरुजी म्हणतो. काही दिवसापूर्वी ते मला नाशिक मधील एका शाळेत घेऊन गेले होते. त्या शाळेतील मुलं दोन्ही हाताने लिहितात. १३६० पर्यंत पाढे म्हणतात यासोबतच सगळी आयपीसी कलम सांगतात.
हे ही वाचा
जागतिक महिला दिनाचे (International Women Day) औचित्य साधत उद्या दिनांक 8 मार्च 2025 रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat) विशेष ग्राम सभा आयोजीत करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संपल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचे ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केलेल्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश 6 मार्च 2025 रोजीच्या पत्रान्वये दिले आहेत.