एक्स्प्लोर
Cough Syrup Deaths: चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणी ED चे Chennai त 7 ठिकाणी छापे, Sresan Pharma कंपनीवर कारवाई
कफ सिरप (Cough Syrup) प्यायल्याने झालेल्या लहान मुलांच्या मृत्यू प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चेन्नईमध्ये (Chennai) मोठी कारवाई केली आहे. Sresan Pharma या कंपनीशी संबंधित सात ठिकाणी ईडीने छापे टाकले असून, मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) अँगलने तपास सुरू आहे. 'माझ्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू खोकल्याच्या आणि सर्दीच्या सिरपमुळे झाला', असा गंभीर आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) औषधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. ईडीची ही कारवाई Sresan Pharma कंपनीने बनवलेल्या 'Coldrif' नावाच्या कफ सिरपशी संबंधित आहे, ज्यामुळे मध्य प्रदेशात अनेक मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या छाप्यांमध्ये तमिळनाडू ड्रग कंट्रोल ऑफिसच्या (Tamil Nadu Drug Control Office) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांचा आणि कार्यालयांचाही समावेश आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















