Green Thane Drive: 'दोन लाख झाडांचं टार्गेट पूर्ण', DyCM Eknath Shinde यांची Thane मध्ये घोषणा

Continues below advertisement
ठाण्यातील मानपाडा (Manpada) परिसरात 'राजमाता जिजाऊ उद्यान' (ऑक्सिजन पार्क) च्या लोकार्पणावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DyCM Eknath Shinde) यांनी शहराच्या हरितकरणावर भाष्य केले. यावेळी बोलताना, 'यावर्षी मी त्यांना दोन लाख झाडांचा टारगेट दिला होता आणि त्यांनी दोन लाख नऊ हजारचा टारगेट पूर्ण केलेला आहे,' असे म्हणत शिंदे यांनी पालिका आयुक्तांचे कौतुक केले. ठाण्यात वृक्षारोपण वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या वर्षी एक लाख झाडे लावण्याचे लक्ष्य दिले होते, ज्यावर आयुक्तांनी एक लाख पंचवीस हजार झाडे लावली होती. लावलेल्या झाडांची वाढ होत असून, ती टिकवण्यासाठी 'जिओ टॅगिंग' (Geo-Tagging) तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी दोन लाखांहून अधिक झाडे लावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत आयुक्तांचे अभिनंदन केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola