एक्स्प्लोर
Viral Video: बुलढाण्याच्या खामगावमध्ये मद्यधुंद महिलेचा 'हाय व्होल्टेज ड्रामा', नागरिकांनी उचलून गाडीत बसवले
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका मद्यधुंद महिलेने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत एक पुरुषही होता आणि तो देखील मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. 'मद्यधुंद महिलेनं भररस्त्यात राडा घातला होता'. रस्त्यावर सुरु असलेल्या या प्रकारामुळे वाहतूक थांबली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अखेरीस, काही नागरिकांनी पुढाकार घेऊन या महिलेला उचलून तिच्या कारमध्ये बसवले. यानंतर काही वेळाने ती कार जालन्याच्या दिशेने निघून गेली. मात्र, ही महिला कोण होती आणि तिच्यासोबत असलेला पुरुष कोण होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















