एक्स्प्लोर
Phaltan Doctor Suicide : पोस्टमार्टम रिपोट बदलण्यासाठी दबाव होता, महिला डॉक्टरच्या कुटुंबाचे आरोप
फलटण (Phaltan) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप आहेत. 'मला पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होता अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाइड करीन, असं ती सांगायची,' असा धक्कादायक खुलासा डॉ. मुंडे यांच्या काकांनी केला आहे. डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये PSI गोपाल बदने यांनी बलात्कार केल्याचा आणि प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी खासदारांच्या पीएचा दबाव होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. डॉ. मुंडे यांनी दोन महिन्यांपूर्वीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, असेही कुटुंबीयांनी म्हटले आहे. या प्रकरणी दोषींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















