एक्स्प्लोर
Dhairyasheel Mohite Patil : मृत व्यक्तीचा वापर कधी राजकारणासाठी करत नाही, धैर्यशील मोहितेंचं वक्तव्य
फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी (Dr Sampada Munde Suicide Case) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मृतभक्तीचा वापर आपण कधी आपल्या राजकारणासाठी करत नाही', असे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एक चांगली टीम नेमून आणि खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने अनेक गोष्टी राज्यासमोर आल्या असून, त्यांनी हातावर बरेच काही लिहून ठेवले होते, असेही मोहिते पाटील यांनी नमूद केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















