Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?

Continues below advertisement

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?

रमेश म्हात्रे.... कालपर्यंत हे नाव नगरसेवक म्हणून कल्याण-डोंबिवलीला माहिती होतं...मात्र रमेश म्हात्रेनं सरकारी रूग्णालयात केलेली गुंडगिरी सीसीटीव्ही क्लिपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर व्हायरल झाली... आणि अखेर रमेश म्हात्रेला पोलिसांना अटक करावी लागली.. पण या लोकप्रतिनिधींना सत्तेचा एवढा माज येतो तरी कुठून? आपण व्यवस्था आणि कायद्यापेक्षा मोठे आहोत असं त्यांना वाटतं तरी कसं? काहीही केलं तरी आपलं कुणीच काहीही बिघडवू शकत नाही ही मानसिकता जन्माला तरी कशी येते? असे अनेक प्रश्न आता महाराष्ट्राला सतावू लागलेत.... फक्त डोंबिवलीलाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेच्या नगरसेवकामध्ये दडलेल्या गुंडाचं दर्शन घडलंय.एका गर्भवती महिलेवर सुविधेअभावी उपचार करू शकत नसल्यानं, तीला मुंबईला हलवण्यात यावं असा सल्ला डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टरांनी दिला. मात्र गर्भवती महिलेच्या कुटुंबानं नगरसेवक रमेश म्हात्रे यांना गाठलं. रमेश म्हात्रे आपल्या गुंडांना घेऊन रूग्णालयात गेले. आणि तिथे डॉक्टरांशी हुज्जत घालायला सुरूवात केली. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्यानंतर सुरूवातीला रमेश म्हात्रेंनी रूग्णालयातील कर्मचाऱ्यावर हात उगारला. आणि त्यानंतर रमेश म्हात्रेचे गुंड रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola