एक्स्प्लोर
Mumbai Crime: 'प्रेम संबंधातून' KEM रुग्णालयातील डॉक्टरवर चाकू हल्ला, महिला कर्मचाऱ्याचा भाऊच आरोपी?
मुंबईतील प्रसिद्ध KEM रुग्णालयात एका डॉक्टरवर चाकूने झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. 'महिला कर्मचाऱ्याशी असलेल्या नातेसंबंधातून हा हल्ला केल्याची माहिती आहे,' असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून, रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या भावानेच हा हल्ला केल्याचा संशय आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















