Diwali Rush: 'देवाच्या दर्शनासाठी नाही, फटाक्यांसाठी रांग', Sambhajinagar मध्ये खरेदीसाठी झुंबड

Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. 'एरवी आम्ही मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग बघत असतो, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क फटाक्यांच्या खरेदीसाठी लांबचलांब अशी रांग लागली आहे.' गंगापूर तालुक्यामधील मुंद्राणा फटाका स्टॉलवर (Mundrana Fataka Stall) हे दृश्य बघायला मिळत आहे. कमी दरात फटाके मिळत असल्यामुळे ग्राहक पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत खरेदीसाठी गर्दी करत आहेत. मंदिरातील दर्शनाच्या रांगेप्रमाणे फटाक्यांसाठी लागलेली ही रांग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील इतर फटाका बाजारातही खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola