Diwali Special: 'राम-कृष्ण विजयाचा उत्सव', नाशिकच्या Kalaram मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Continues below advertisement
आज देशभरात दिवाळीचा (Diwali) सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी लक्ष्मीपूजनाला (Laxmi Pujan) विशेष महत्त्व असून, नाशिकमधील (Nashik) प्रसिद्ध काळाराम मंदिरात (Kalaram Temple) दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. 'भगवान श्रीरामांनी चौदा वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा वध करून अयोध्येला परतणे आणि भगवान कृष्णानं नरकासुराचा वध करणे, या विजयाचं प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते,' अशी या सणाची मुख्य ओळख आहे. याच श्रद्धेपोटी, नाशिककर आज प्रभू श्री काळारामाच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी करत आहेत. रावणाच्या वधानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला परतल्याच्या स्मरणार्थ दिवे लावून हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार, भगवान कृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले, त्या विजयाचा हा उत्सव मानला जातो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola