एक्स्प्लोर
High Court Order: Dilip Khedkar यांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर
नवी मुंबईतील ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणी फरार असलेले दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने दिलीप खेडकर यांना पंचवीस हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करतानाच, पीडित क्लीनरला चार लाख रुपये नुकसान भरपाई तसेच पोलीस वेलफेअर निधीत एक लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. बेलापूर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर खेडकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १३ सप्टेंबर रोजी ऐरोली-मुलुंड ब्रीजवर झालेल्या अपघातानंतर क्लिनरचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याचा आरोप दिलीप खेडकर यांच्यावर आहे. तेव्हापासून ते फरार होते. यापूर्वी त्यांची पत्नी मनोरमा खेडकर यांनाही अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता, त्यानंतर आता दिलीप खेडकर यांनाही जामीन मिळाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















