एक्स्प्लोर
Dharashiv Heavy Rain : धाराशिवमध्ये पुराच्या पाण्यात सगळं गेलं...मदत अद्याप पोहोचली नाही
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांची घरे, जनावरे आणि अन्नधान्य पाण्यासोबत वाहून गेले आहे. शासनाने पूरबाधित नागरिकांसाठी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली होती, परंतु ही मदत अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. शिरसाव गावातील पूरबाधित शेतकरी धन्य कुमार पाटील यांनी आपली व्यथा मांडताना म्हटले, "काहीच राहिलं नाही. घरात असं रहायचं असं भांडं वस्त्रं बाजली डबं काय राहिलं ते काय सगळंच गेलं." त्यांच्या म्हणण्यानुसार, कडबाकुटी, अंथरूण-पांघरूण, गाद्या, उशा, तसेच शेतीसाठीचे पाईप आणि स्प्रिंकलरचे दोन सेट असे सर्व काही वाहून गेले आहे. कोणताही शासकीय अधिकारी त्यांच्या घरापर्यंत मदतीसाठी आलेला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाले असून, त्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष : शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आणखी पाहा
Advertisement
Advertisement















