Dhananjay Munde on Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद पाडलं - धनंजय मुंडे

Continues below advertisement
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यात दिलेल्या योगदानाचा पाढा वाचला आहे. 'नर-न्यांतून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सभागृहात आवाज उठवला', असे ठाम प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी केले. त्यांनी परळीत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला मदत केल्याचे सांगितले, तसेच स्वर्गीय अण्णासाहेब जावळे आणि स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्यासोबतच्या कार्याची आठवण करून दिली. विरोधी पक्षनेता असताना विधानपरिषदेचे कामकाज बंद पाडल्याचा उल्लेखही त्यांनी केला. याशिवाय, नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर सर्वात आधी आपणच पोहोचलो आणि आरोपींना अटक होईपर्यंत अधिवेशन चालू दिले नाही, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola