Munde vs Jarange: ‘मला संपवायला निघाले, माझी ब्रेन मॅपिंग, नार्को आणि सीबीआय चौकशी करा’

Continues below advertisement
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यातील वाद आता अधिकच चिघळला आहे. मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, तसेच एका मोठ्या कटातून आपल्याला संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. 'काहीही करुन या प्रकरणाची चौकशी सीबीआय (CBI) कडेच घेणं पाहिजे, त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे ही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही,' असा थेट इशारा मुंडे यांनी दिला आहे. आपल्यावर होणारे आरोप आणि धमक्या पाहता आपली ब्रेन मॅपिंग (Brain Mapping), नार्को टेस्ट (Narco Test) आणि सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पंचवीस वर्षे आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीमुळे माझ्यावर ही वेळ का यावी, असा भावनिक सवालही त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या मेहुण्याच्या वाळूच्या ट्रकचा (Sand Trucks) उल्लेख करत त्यांच्यावर अवैध व्यवसाय केल्याचा आरोप केला. मराठा समाजाने ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) हट्ट सोडावा आणि सरकारने दिलेल्या दहा टक्के EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola