एक्स्प्लोर
Devendra Fadnavis On Priyank Kharge प्रियांक खरगे यांचं वक्तव्य प्रसिद्धीसाठी, फडणवीसांची टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महायुतीची रणनीती आणि आरएसएस बंदीच्या मागणीवरून काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकारण तापले आहे. 'कर्नाटकचे जे प्रियांक खर्गे आहेत हे प्रसिद्धीकर्ता असल्यागोठी करत असतात, वडिलांच्या भरोशावर राजकारण करणारे ते आहेत,' असा थेट हल्लाबोल फडणवीसांनी केला. ज्या इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले, याची आठवण करून देत संघ ही एक देशभक्त आणि सांस्कृतिक शक्ती असल्याचे फडणवीस म्हणाले. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांसाठी महायुती म्हणून लढण्यावर भर दिला जाईल आणि जिथे युती शक्य नसेल तिथे मित्रपक्षांवर टीका न करण्याचे स्पष्ट निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















