Devendra Fadnavis Birthday | शरद पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव, 'Maharashtra Nayak' पुस्तकातून स्तुतीसुमने

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कौतुक केले आहे. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'महाराष्ट्र नायक' या पुस्तकात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची प्रशंसा केली. "देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट आहे. त्यांचं कार्य आणि त्यांचे कष्ट बघून ते थकत कसे नाहीत, तसा प्रश्न पडतो. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीसांची देखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्राक्रमाने ती वृद्धींगत होत राहो," असे अभीष्ट चिंतन पवारांनी केले आहे. या पुस्तकाचे विमोचन राज्यपालांकडून करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून, भविष्यात त्यांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. नितीन गडकरी यांनी फडणवीसांना 'विकासाचा ध्यास असलेला कार्यकुशल नेता' असे संबोधले आहे, तर अजित पवार यांनी 'मैत्री जपणारं नेतृत्व' असे म्हटले आहे. गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनीही या पुस्तकात फडणवीसांवर लेख लिहिले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola