Devendra Fadnavis politics : फडणवीसांची '२०२९' ची भविष्यवाणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Special Report

Continues below advertisement
नागपुरात पत्रकारांशी दिवाळीच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनेक राजकीय बॉम्ब फोडले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीची (Mahayuti) रणनीती, शक्तिपीठ महामार्गातील (Shaktipeeth Highway) संभाव्य बदल आणि जातीय राजकारणावर त्यांनी स्पष्ट भाष्य केले. 'एक बाब मी तुम्हाला निश्चित सांगतो, दोन हजार एकोणतीस पर्यंत मी महाराष्ट्रात पक्का आहे, त्यानंतरचा निर्णय पक्ष करेल,' असे विधान करून फडणवीसांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. यावर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, 'तेव्हापर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का?' असा प्रतिप्रश्न करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. मुंबईत महायुती म्हणून, तर ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत, ज्यामुळे स्थानिक राजकारण तापले आहे. मतदार याद्यांतील घोळावरूनही त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola