Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोण करणार पांडुरंगाची पूजा?
Continues below advertisement
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. यंदाच्या कार्तिकी एकादशीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना मिळणार, हा प्रश्न विठ्ठल मंदिर समितीसमोर उभा राहिला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे की राष्ट्रवादीचे अजित पवार, यापैकी कोण पूजा करणार याबाबत संभ्रम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंदिर समितीने राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागवले आहे. मंदिर समिती विधी व न्याय विभागाला पत्र पाठवून विचारणा करणार आहे. विधी व न्याय विभागाकडून सूचना मिळाल्यानंतरच उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले जाईल, असे मंदिर समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंढरपूर नगरीत सध्या 'उपमुख्यमंत्री दोन, पण पूजेचा मानकरी कोण' अशी चर्चा सुरू आहे. कार्तिकी एकादशी २ नोव्हेंबर रोजी आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement