एक्स्प्लोर
Crop Crisis: '...आंब्याचा सीझन दीड-दोन महिने लांबणार', व्यापाऱ्यांच्या दाव्याने Hapus प्रेमींची चिंता वाढली!
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हापूस (Hapus) आंब्याच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आंब्याचा सीझन आणखी लांबणार म्हणजे महिना नाही तर कदाचित दीड दोन महिने सुद्धा लांबू शकतो'. पावसामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली आहे, कारण या प्रक्रियेसाठी कडाक्याच्या थंडीची आवश्यकता असते. जोपर्यंत पाऊस थांबून थंडी सुरू होत नाही, तोपर्यंत मोहोर येणार नाही. यामुळे यंदा हापूस आंब्याचा हंगाम एक ते दीड महिने लांबणीवर पडणार असून आंब्याच्या उत्पन्नातही मोठी घट होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















