Cough Syrup Deaths | MP, Rajasthan मधील बालकांच्या मृत्यू प्रकरणी Maharashtra FDA ची कारवाई
Continues below advertisement
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप औषधामुळे अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाने विना प्रिस्क्रिप्शन औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांचा शोध सुरू केला आहे. या शोध मोहिमेदरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन विभागाने 88 औषध विक्रेत्यांकडे संबंधित औषधाचा साठा आढळल्यानंतर त्यांना तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रशासनाने ही कठोर पाऊले उचलली आहेत. औषधांच्या गुणवत्तेवर आणि विक्री नियमांवर लक्ष ठेवणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे. या कारवाईमुळे औषध विक्रीतील अनियमितता समोर आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement