Cordilla Cruise Case : 'कॉर्डिलिया क्रूजवर 'त्या' दिवशी न्यायदंडाधिकारीही होते?पाहा कुणी केलाय दावा?

Continues below advertisement

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मोठी बातमी समोर येतेय. कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं जेव्हा कारवाई केली त्यावेळी त्या क्रूझवर एक न्याय दंडाधिकारी होेते, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केलाय...  
सीबीआयकडे तक्रार देऊनही ते दाद देत नसल्यानं  केतन तिरोडकरांनी हायकोर्टात याचिका दाखल केली....  सीबीआयनं वानखेडेंविरोधात कॉर्डिलिया प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात साक्ष नोंदवण्याची  मागणी याचिकेत करण्यात आलीए.... आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझवर एका न्याय दंडाधिका-यालाही एनसीबीच्या अधिका-यांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्याला गुप्तपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा  आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी केलाय... क्रुझवर  दंडाधिकारी नशेत होते त्यांना थेट रूग्णालयात नेण्यात आल्याचही तिरोडकर म्हणालेत.. दरम्यान याचिकेच्या वैधतेवर सवाल उपस्थित करत याचिकाकर्त्यांकडून एखाद्या प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आलीए... शिवाय कोर्टानंही याची दखल घेत न्यायव्यवस्थेवर करत असलेल्या गंभीर आरोपांमागील आधार काय? असा सवाल उपस्थित केला.  तूर्तास या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टानं तीन आठवड्यांसाठी तहकूब केलीय. मात्र सीबीआयला या प्रकरणात लक्ष घालण्याचे तोंडी निर्देश दिले आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram