Tukdoji Maharaj Punyatithi : अमरावतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली

Continues below advertisement
अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव लाखो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार अनिल बोंडे, आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी एका वक्त्याने केलेल्या, 'काही संभाजीनगरमध्ये कुत्रं येऊन भोकुन जातात, तर त्यांना ही ताकद वेळोवेळी आम्हाला जेव्हा दाखवायची तर भगवे लोकच नक्की त्यांना दाखवतात,' या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात, गुरुदेव भक्तांनी ४ वाजून ५८ मिनिटांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी अशा सर्वधर्मीय प्रार्थनांचे पठण करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो दिंड्या आणि पालख्यांसह लाखो भाविक या महोत्सवासाठी दाखल झाले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola