एक्स्प्लोर
Statewide Stir: 'आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा', Nagpur, Solapur मध्ये काँग्रेस आक्रमक
दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील नागपूर, सांगली आणि सोलापूरमध्ये विविध मुद्द्यांवरून नागरिक आणि काँग्रेस पक्षाने आंदोलने केली आहेत. 'आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा', असा थेट इशारा देत काँग्रेसने सोलापूरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. नागपूरमध्ये कचऱ्याचे ढीग आणि रस्त्यांच्या दुरावस्थेवरून काँग्रेसनं आंदोलन केलं, तर दुसरीकडे सांगलीमध्ये पाणीपुरवठा ठप्प झाल्याने संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा विभागासमोर रिकाम्या घागरी घेऊन आंदोलन केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















