Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Continues below advertisement

Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ असल्याचं म्हटलं. यामुळं राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली. शरद पवार यांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ आहेत, काय करतील माहिती नाही. मोदी शाह सरकार हात धुवून लागलेलं आहे, विरोधी पक्ष अस्तित्वात नसावा, अशी त्यांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे केलं ते पवार साहेबांच्या एनसीपीत होऊ शकतं. खासदार सोडून जातील की नाही मात्र अस्थिर आहेत, असं ऐकतोय, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आमच्या पक्षातील कोणताही खासदार अस्वस्थ नाहीये. आम्ही आठ खासदार एकसंघ आहोत. आम्ही सर्व जण सुप्रिया ताईंच्या नेतृत्त्वात सभागृहात काम करतो. आदरणीय साहेबांच्या आदेशानं, सहकार्यानं काम करतो, असं बजरंग सोनवणे म्हणाले. आम्हाला ऑफर यायचा प्रश्न नाही, आम्ही ऑफरच्या पलीकडे आहोत, त्यामुळं आम्हाला ऑफर यायचा प्रश्न नाही, असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. आम्ही आठच्या आठ जण एकत्र आहोत, असंही सोनवणे यांनी म्हटलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola