एक्स्प्लोर
BMC Election : 'वोट चोर गद्दी छोड' हा नारा Maharashtra तही चालेल, Bhai Jagtap यांचा केंद्रावर निशाणा
मुंबई महानगरपालिका (BMC) आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी पक्षाच्या भूमिकेविषयी मोठे विधान केले आहे. 'तुमचे जे तिथे दिल्लीत प्रमुख बसलेले आहेत ना ज्यांना सरकारकडून अॅडवर्टायजमेंट पाहिजेत, त्यांचा अजेंडा जो आहे तो जो चालला जातो तो चालू द्या,' असे म्हणत जगताप यांनी माध्यमांवर टीका केली. काँग्रेसने या निवडणुका स्वबळावर लढायला हव्यात, असे मत त्यांनी ठामपणे मांडले. ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना संधी मिळायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे. मुंबई काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांच्यासमोरही आपण हेच मत मांडल्याचे त्यांनी सांगितले. बिहारमधील 'वोट चोर गद्दी छोड' हा नारा आता महाराष्ट्र आणि देशभरात चालेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, आघाडी किंवा युतीबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















