एक्स्प्लोर
Seat Sharing: अहिल्यानगरमध्ये 68 जागांसाठी Ajit Pawar गटाचे 200 इच्छुक, Mahayuti मध्ये पेच
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बैठकीत तब्बल २०० हून अधिक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, 'अहिल्यानगर महानगरपालिकेत केवळ ६८ जागा असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे २०० जण इच्छुक आहेत', त्यामुळे महायुतीमध्ये जागेच्या वाटपावरून मोठा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गट हे प्रमुख पक्ष आहेत. राष्ट्रवादीच्या या मोठ्या दाव्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून, आघाडीत जागावाटपाचा तिढा कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















