Zero Hour : ‘राजकीय इस्लामने सनातनवर आघात केला’, योगींचा हल्लाबोल
Continues below advertisement
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'राजकीय इस्लाम'वर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'राजकीय इस्लामने सनातन धर्मावरती सर्वाधिक मोठा आघात केला', असे ते गोरखपूर येथील एका कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या मते, ब्रिटीश आणि फ्रेंच वसाहतवादाबद्दल चर्चा होते, पण राजकीय इस्लामच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जाते. योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंग, महाराणा प्रताप आणि महाराणा सांगा या राष्ट्रनायकांनी केवळ वसाहतवादाविरुद्धच नव्हे, तर 'राजकीय इस्लाम' विरोधातही मोठा संघर्ष केल्याचे सांगितले. त्यांनी हलाल सर्टिफिकेशनमधून मिळणारा पैसा दहशतवाद, लव्ह जिहाद आणि धर्मांतरासाठी वापरला जात असल्याचा आरोपही केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement