एक्स्प्लोर
Maha Local Polls: 'मित्र पक्षाला डिवचू नका', CM Devendra Fadnavis यांचा स्वबळाचा नारा देणाऱ्यांना इशारा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) ॲक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणमध्ये बैठकांचा धडाका लावला आहे. 'आपला जो मित्र पक्ष आहे, त्याला डिवचू नका,' अशा स्वरूपाची सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांनी स्वबळाचा आग्रह धरणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना दिली आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी भाजप स्वबळावर लढण्यास सक्षम असल्याची भावना व्यक्त केली असली तरी, फडणवीसांनी महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला दिला, मात्र मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मराठवाड्यातील बैठकीत शिंदे गटासोबत जुळवून घेण्याबाबत सकारात्मकता असली तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध दिसून आला. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी '100 प्लस'चा नारा दिला आहे, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट दोघेही स्वबळाच्या दृष्टीने तयारी करत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?
Akola News : तरुणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत, पत्र लिहिणारा लग्नाळू तरुण ABP Majha वर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















