EVM Row : 'तुम्ही मतचोरी म्हणून नोटचोरी केली', मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा Rahul Gandhi यांना टोला
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर 'मतचोरी'च्या आरोपांवरून जोरदार टीका केली आहे, तसेच शेतकरी कर्जमाफीची (Farm Loan Waiver) घोषणा केली आहे. 'मतचोरी, वोटचोरी, वोटचोरी करून अरे तुम्ही मतचोरी, वोटचोरी, वोटचोरी म्हणून एवढे वर्ष नोट चोरी, नोट चोरी, नोट चोरी करून या देशाला बुडवलं', असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि विरोधकांवर निशाणा साधला. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असून, कर्जमाफीबाबत समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आल्यानंतर ३० जूनपूर्वी निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आपल्या सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात 'लेक लाडकी लखपती', एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत आणि 'मुख्यमंत्री सहायता निधी'तून हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्यासारख्या अनेक लोकाभिमुख योजना राबवल्याचे त्यांनी सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement