Ladki Bhain yojna: 'जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Continues below advertisement
फलटण येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी बहीण' योजनेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. 'जोपर्यंत देवा भाऊ (देवेंद्र फडणवीस), शिंदे साहेब (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आणि अजित दादा (अजित पवार) आहेत, तोपर्यंत आम्ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही', असे ठाम आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आम्ही सुरू केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. विरोधकांकडून ही योजना बंद होणार असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्या लाडक्या बहिणींना दिवाळीची ही भाऊबीज सातत्याने मिळत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola