एक्स्प्लोर
Nagpur Devendra Fadnavis : बास्केटबॉल स्पर्धेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हस्ते उद्घाटन
नागपूरच्या धरमपेठ क्रीडा मंडळाच्या मैदानावर राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. 'आणि मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की धरमपेठ क्रीडा मंडळ यांना या आयोजनाचा मान मिळालेला आहे,' असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. राज्य बास्केटबॉल असोसिएशन आणि नागपूर बास्केटबॉल असोसिएशन यांनी या स्पर्धेचे आयोजन केले असून, यात राज्यभरातील विविध जिल्ह्यांचे संघ सहभागी होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धरमपेठ क्रीडा मंडळाने ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल आणि खेळाडू घडवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मंडळाचे अभिनंदन केले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः बास्केटबॉल खेळण्याचा आनंदही घेतला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















