Gadchiroli Health: 'विकास'! CM देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सिरोंचा, अहेरीमध्ये दोन मोठ्या आरोग्य प्रकल्पांची भेट
Continues below advertisement
राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्याला दोन मोठ्या आरोग्य सुविधा मिळाल्या आहेत. या प्रकल्पामुळे गडचिरोलीच्या दक्षिण भागातील आरोग्य सेवा बळकट होणार आहे, जिथे नागरिकांना उपचारासाठी तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिरोंचा (Sironcha) येथे एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन आणि अहेरी (Aheri) येथे १०० बेडच्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. हे रुग्णालय अहेरी, भामरागड आणि सिरोंचा यांसारख्या भागांसाठी जीवनदायिनी ठरेल. फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राणा सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून सिरोंचा येथे हे मेडिकल कॉलेज उभे राहत आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वीकारले होते आणि ते हे पद सांभाळणारे पहिले मुख्यमंत्री ठरले होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement