War of Words: 'महाराष्ट्राचा पप्पू बनू नका', मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा Aditya Thackeray यांच्यावर हल्लाबोल
Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यात मतदार यादीच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये', असा थेट टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आणि बनावट मतदार नोंदवल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी 'बोगस सरकार, बोगस मतदार' नावाने सादरीकरण करून केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी, आदित्य ठाकरे पराभवाच्या भीतीने राहुल गांधी यांची नक्कल करत असल्याचा दावा केला. हा केवळ निवडणूक आयोगाचा अपमान नसून, पराभव दिसू लागल्याने केलेली ही केविलवाणी धडपड असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement