City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 30 जुलै 2024 | ABP Majha
उद्धव ठाकरे समोरून बाहेर पडले, मात्र भेट न घेतल्यानं सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नाराज. नाराज कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जाऊन केलं अभिवादन.
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलनाचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा, आज दुपारी १२ वाजता मातोश्री इथं कार्यकर्ते जमणार, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी.
अहमदनगरचे झेडपीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार श्रीगोंदा विधानसभा लढवण्यास इच्छुक, अनेकांच्या निवडणुकीत अण्णासाहेब शेलारांचा मोलाचा वाटा.
मेधा पाटकर यांना दिलासा, दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी अवमानप्रकरणात दिल्ली सत्र न्यायालयाकडून मेधा पाटकर यांच्या शिक्षेला स्थगिती.
कोयना धरण परिसरात पावसाची संततधार सुरुच, त्यामुळे धरणाच्या सहा वक्र दरवाजातून 40 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाणार,
विशाळगड प्रकरणात पोलीस आणि राज्य सरकारचा उच्च न्यायालयात अजब दावा, 'तोडफोडीवेळी अतिवृष्टी, दृश्यमानता कमी असल्याने कारवाई करता आली नाही', सरकारी वकिलांची न्यायालयात माहिती.