CIDCO Scam: 'मलिदा गँगचे मास्टरमाइंड शिरसाट, राजीनामा द्या', रोहित पवारांची थेट मागणी
Continues below advertisement
नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी (CIDCO Land Scam) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. 'आता तरी मनिता गँगचे मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाइंड शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची उरली सुरली विश्वासार्हता रसातळाला जाण्यापासून वाचवा,' अशी थेट मागणी रोहित पवार यांनी केली आहे. ब्युलकर (Bivalkar) कुटुंबाने सुमारे १,४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे वन विभागाच्या चौकशी अहवालात समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या अहवालाच्या आधारावर वन विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली असून, हे पुरावेच आमदार रोहित पवार यांनी सादर केले आहेत. तत्कालिन सिडको अध्यक्ष म्हणून संजय शिरसाट यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement