एक्स्प्लोर
CIDCO News : 'सिडकोकडून सर्वसामान्यांची लूट',सिडकोच्या घरांच्या किंमती खाजगी बिल्डरपेक्षा जास्त
सिडको (CIDCO) कडून वाशी-खारघर परिसरातील घरांच्या विक्रीतून सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याचा आरोप समोर आलाय. माहिती अधिकारात उघड झालेल्या माहितीनुसार, सिडकोने ३२ लाख खर्चून बांधलेली घरं तब्बल ७५ लाखांपर्यंत विकली आहेत. 'सिडकोकडून सर्वसामान्यांची लूट होत आहे', असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, आमदार, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी सिडकोने कमी दरात पंचतारांकित गृहप्रकल्प उभारले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सिडकोच्या या कारभारावर सरकार आणि प्रशासन काही कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माहिती अधिकारात समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सिडकोच्या घरांच्या किंमती खाजगी बिल्डरपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















