एक्स्प्लोर
Lavani Controversy: 'शरद पवारांसमोर कोणी लावणी केली माहितीये', चित्रा वाघ यांचा Supriya Sule यांना टोला
राजकीय नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात लावणीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या कार्यालयात शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत लावणीचा कार्यक्रम झाल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. 'सुप्रिया सुळे विसरल्या असतील, पण शरद पवारांसमोर कोणी लावणी केली हे देखील आपल्याला माहिती आहे', असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये लावणी होणे ही काही नवीन गोष्ट नाही, असे सांगत वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. जुन्या राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाची आठवण करून देत वाघ यांनी या वादाला एक नवीन तोंड फोडले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















