Farmers Protest: 'झोपलेल्या कृषिमंत्र्यांना जागं करण्यासाठी आंदोलन', Dattatray Bharane यांच्याविरोधात शेतकरी आक्रमक
Continues below advertisement
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर छावा क्रांतिवीर सेना (Chhava Krantiveer Sena) आक्रमक झाली असून, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. 'अशा अजित पवारांना (Ajit Pawar) सत्तेत ठेवू नका', असं थेट आवाहन छावा क्रांतिवीर सेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केलं आहे. अवकाळी पावसानं शेतकरी संकटात असताना कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत आणि ते फक्त पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे कृषिमंत्री आहेत का, असा सवाल आंदोलकांनी केला आहे. 'झोपलेल्या कृषिमंत्र्यांना जागं करण्यासाठी' हे आंदोलन असून, हजारो शेतकरी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement