Maharashtra Superfast News : 8 च्या अपडेट्स : 8.30 AM : 18 OCT 2025 : ABP Majha

Continues below advertisement
मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे राजकीय वैमनस्य विसरून पुन्हा एकत्र आले. दुसरीकडे, बीडमध्ये ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) संरक्षणासाठी झालेल्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'हे जर थांबवलं नाही, तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे, हा डीएनए कधी सरकेल काही सांगता येणार नाही,' असा इशारा भुजबळांनी दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश आनंद घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला. भुजबळांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर समाजात फूट पाडल्याचा आरोप केला आणि जातीय जनगणनेची मागणीही पुन्हा केली. या सभेदरम्यान धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यात चष्म्यावरून शाब्दिक युद्ध रंगले, तर परभणीत एका शेतकऱ्याने हमीभाव मिळत नसल्याने आपले सोयाबीन पीक पेटवून दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola