Chhagan Bhujbal Beed :17 ऑक्टोबरला भुजबळांची बीडमध्ये महाएल्गार सभा; हाकेंची नाराजी दूर?
Continues below advertisement
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोबर रोजी बीडमध्ये (Beed) महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये, ही सरकारची जबाबदारी आहे, असे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजातर्फे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या बॅनरवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचा फोटो लावण्यात आल्याने, त्यांची नाराजी दूर झाल्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी २८ सप्टेंबर रोजी होणारी सभा अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता १७ ऑक्टोबरच्या सभेमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement