Chef Vishnu Manohar : शेफ विष्णू मनोहर यांचा सलग 25 तास डोसे बनवण्याचा विक्रम
Continues below advertisement
विख्यात शेफ विष्णू मनोहर (Chef Vishnu Manohar) यांनी अमरावती (Amravati) शहरामध्ये सलग पंचवीस तास डोसे बनवण्याचा नवा विक्रम केला आहे. 'मागील वर्षी दिवाळीत नागपूरमध्ये केलेला सलग चोवीस तासांचा विक्रम मोडून पंचवीस तास डोसे बनवून नवीन विक्रम प्रस्थापित करणार', असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. काल शनिवारी सकाळी सुरू झालेल्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली. रेसिपी क्षेत्रामध्ये आजवर तीस उपक्रमांची नोंद विष्णू मनोहर यांच्या नावावर असून, अमरावतीत नोंदवलेला हा त्यांचा एकतिसावा विक्रम आहे. या डोशांची चव घेण्यासाठी खवय्यांनी मोठी गर्दी केली होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement