Mahayuti Special Reportराष्ट्रवादी शरद पवारांची,शिवसेना ठाकरेंची,पाटलांच्या वक्तव्याने राजकारण तापलं
Continues below advertisement
भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पाटील यांनी शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पक्ष मालकी हक्काच्या वादावर थेट भाष्य केल्याने त्यांचेच मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटात अस्वस्थता पसरली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? तर शरद पवारांची (Sharad Pawar). शिवसेना कोणाची? तर तो बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धवजींचा (Uddhav Thackeray)', असे विधान चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील तासगाव येथील कार्यक्रमात केले. विशेष म्हणजे, या विधानावर सर्वत्र चर्चा सुरु झाल्यानंतरही पाटील आपल्या मतावर ठाम राहिले आणि त्यांनी कोल्हापुरातही त्याचा पुनरुच्चार केला. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, तो कोणा एका नेत्याचा नाही, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यांच्या या विधानावर अजित पवार गट आणि शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जनतेने विधानसभा निवडणुकीत अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिला आहे, त्यामुळे अशा प्रमाणपत्राची गरज नाही, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement